चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या वनिता जितेंद्र राऊत या महिला उमेदवाराने खासदार म्हणून निवडून आल्यावर ” गाव तिथे बियर बार ” सुरू करून बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे आश्वासन दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिला उमेदवाराने खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा केली आहे.
चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात निवडणूक रिंगणात एकूण १५ उमेदवार आहेत. यात काँग्रेस, भाजप, वंचित अश्या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. मात्र सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चर्चा आहे ती अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची. विकास कार्याचे आश्वासन घेऊन नेते जनते समोर उभे होतात. याला वनिता राऊत अपवाद ठरल्या आहेत. गाव तिथे बिअर बार उघडू. बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ, असे आश्वासन त्या देत आहेत.
खासदार झाले तर खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे मतदार किती आकर्षित होतात हे बघणे उस्तुकतेचे ठरणार आहे. वनिता राऊत ह्या सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावातील रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर येथून २०१९ ची लोकसभा, २०१९ मध्ये चिमूर विधानसभा निवडणुक लढवली आहे. दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यावेळी जिल्ह्यात दारुबंदी होती. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी उठवून ठिकठिकाणी दारूचे दुकाने उघडण्यात यावी अशी मागणी केली होती.
गाव तिथे दारूचे दुकान असे धोरण त्यांचे आहे.समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणे ही फार मोठी चूक असल्याचे त्या म्हणतात. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा दारुसाठी प्रसिद्ध आहे. बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी ही महिला उमेदवार थेट बिअर बारचा परवाना देणार आहे, असे आश्वासन देत फिरत असल्याने मतदारांमध्ये या महिला उमेदवाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
चिमूर : - संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतातील पवित्र श्रद्धास्थान असलेल्या श्री हरी बालाजी महाराजांच्या घोडा यात्रेला सुरुवात झाली आहे. रथावर स्वार असलेल्या घोडेस्वार भगवान श्री कृष्णाची मूर्ती भक्तांसाठी महत्त्वाची मानली जाणारी प्रतिकृती नगरी 'रातघोडा' म्हणून ओळखली जाते. 22 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजता हा महोत्सव सुरू होणार आहे. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. रात्रभर शहरात प्रदक्षिणा केल्यानंतर हा रथ बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवला जातो.
महाशिवरात्रीपर्यंत भाविकांना या रथाचे दर्शन घेता येणार आहे.
हा उत्सव 397 वर्षांपासून साजरा केला जात आहे. बालाजी महाराज देवस्थान ट्रस्टने उत्सवाच्या आयोजनाची तयारी पूर्ण केली आहे. यात्रेदरम्यान होणाऱ्या जत्रेची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षाही 22 फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याने नेहरू विद्यालयात सुरू असलेली जत्रा तलावाच्या वरच्या टोकाला हलवण्यात आली आहे.
चिमूर - पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या चंद्रपूर जिल्हा शैक्षनींक मदत कक्षाच्या सदस्यपदी श्रीहरी सातपुते यांची चिमूर व सिंदेवाही तालुक्याकरिता निवड करण्यात आली आहे राज्यभरात पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक अडचणी येऊ नये म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेने देशभरात शैक्षणिक मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाचे राज्यप्रमुख तथा व्हॉईस ऑफ मीडिया राज्य सरचिटणीस चेतन कात्रे यांचे सुचणेनुसार व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तालुका निहाय शैक्षनिक विभागाचे काम करण्यासाठी पंधरा तालुक्याकरीता प्रत्येकी दोन या प्रमाणे सात जणांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये चिमूर - शिंदेवाही करीता श्रीहरी सातपुते यांचे सोबत चंद्रपूर - बल्लारपुर करीता शंकर महाकाली. राजुरा - कोरपना - जिवती करीता दीपक शर्मा. वरोरा - भद्रावती करीता चेतन लूतडे. मुल - सावली करीता रमेश माहुंरपवार. नागभीड - ब्रम्हपुरी करीता गोवर्धन दोनाडकर. व गोंडपिपरी - पोंभूर्णा करीता बाळू निमगडे यांची तालुका निहाय पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
सावली : येथील आर. एस. बिअरबारसमोर झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. २२) रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात शोभा नामदेव धारणे (५५) या दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर निखिल युवराज गायकवाड (२३) व धर्मराज पांडुरंग गायकवाड (४५) तिघेही रा. विहीरगाव, ता. सावली हे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता गडचिरोलीला हलविण्यात आले. चारचाकी वाहन चालक बाबुराव खैरे रा. चंद्रपूर याला सावली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विहीरगाव येथील निखिल
गायकवाड, धर्मराज गायकवाड व शोभा धारणे हे राजगड येथून बारशाचा कार्यक्रम आटोपून सावलीमार्गे विहीरगाव या स्वगावी निघाले होते. दरम्यान, सावली येथील आर. एस. बारसमोर मागाहून येणाऱ्या चारचाकी वाहनाने (क्र. एमएच ३३ जे १४९४) जबर
धडक दिली. यामध्ये दुचाकीला सुमारे काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यात शोभा नामदेव धारणे यांचा जागीच मृत्यू झाला तर निखिल व धर्मराज हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती पोलिसांना माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक करून जखमी व मृतक महिलेला सावलीचे ग्रामीण रुग्णालयात भरती केले. पुढील उपचाराकरिता गंभीर जखमींना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. पुढील तपास सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू, मोहन दासरवार, दिलीप मोहले, विशाल दुर्योधन हे करीत आहेत.
चिमुर तालुक्याच्या टोकावर असलेल्या माकोणा गावात दोन वर्षांपासून अंगणवाडी सेविका नाही यांचे मुख्य कारण म्हणजे निर्मला पुरुषोत्तम सेलकर या माकोणा गावाच्या अंगणवाडी च्या सेविका आहेत परंतु गेल्या २ वर्षांपासून त्याची परीस्थिती हालावली त्यामुळे माकोणा गावच्या अंगणवाडी ला अंगणवाडी सेविका नाही त्यामुळे लहान मुलांना शिक्षण घेणे, किंवा हुशार होण्यासाठी बुध्दीमता जागृत करण्यासाठी अंगणवाडी सेविका उपलब्ध नाही आहे त्यामुळे आता माकोणा गावकऱ्यांच्या वतीने तालुका व जिल्हा स्तरावरील संबंधित प्रशासनाला मागणी करत आहे की माकोणा गावच्या अंगणवाडी सेविका ची जाहिरात काढण्यात यावी आणि गावातील सुशिक्षित महिलेला संधी मिळावी कारण शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे त्यामुळे लहानपणापासून हे मुलांना पाजले तर मुलं अतिशय बुद्धिमान होणार कारण मुलांना शिक्षण घेणे गरजेचे आहे पंरतु शिक्षण देणारे सुध्दा सक्रिय होणे गरजेचे अपेक्षीत आहे कुठल्याही काॅपी करुन पास होणार्या अंगणवाडी सेविका बनवु नयेत असे झालेतर गावातील सुशिक्षित नागरिक चौकशी बसवून पित उघडे पाडणार अशी माहिती माकोणा गावातील सुशिक्षित युवक जगदीश खटुजी मेश्राम यांनी दिली आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविकाचे सेवावृत्तीची वेळ झाली त्यामुळे आता लवकरच जाहिरात काढून अंगणवाडी सेविका म्हणून नवीन भरती करा अशी मागणी माकोणा ग्रामवासी करत आहे
नागभीड तालुक्यातील मौजा ईरव्हा (टेकडी)येथील रहिवासी नामे लोकमन यादव मैंद वय 20 वर्ष या तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून दुदैवी मृत्यु झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
सदर घटना मौजा पाहर्णी - ईरव्हा रत्यावर घटणा घडली आहे.
, पाहर्णी येथे घरचे धान भरडाई करिता राईस मिल वर टॅ्क्टर नी धान सकाळी आणले होते.ते धान भरडाई करुण ( तादुंळ पिसुन) दुपारी 3:00 वाजताच्या सुमारास ईरव्हा टेकडी गावाकडे जात असताना वळणावर टॅ्क्टरची ट्रॉली ली पलटी झाली. त्यात लोकमान चा टॅ्क्टरखाली आल्याने जागीच मृत्यु झाला. वरील घटनेची माहिती संबधित पोलीस विभाग नागभीड ला देण्यात आली. लगेच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटना स्थळी दाखल होऊन मृतकाचा स्थळ पंचनामा करुन मृतकाचे पार्थीव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय येथे नेण्यात आले.आज सकाळी मृतदेह घरच्याच्या ताब्यात देण्यात आले, मौजा ईरव्हा टेकडी येथील स्मशानभूमीत अंत्यस्कार करण्यात आले.
चिमूर येथे कार्यक्रमाला डॉ . सतीश वारजुकर यांची उपस्थिती
चिमूर : शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचा स्मृतिदिन कार्यक्रम चिमूर येथील जागतिक गोंड संगा मांदी शाखा चिमूर वतीने गोंड मोहल्ला येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ.सतीश वारजूकर, प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे,अध्यक्ष म्हणून मनोज शिंह गोंड मडावी,विजय शिंह मडावी, संदीप कावरे, वैधकीय अधिकारी डॉ. आनंद किन्नाके,सहायक लेखाधिकारी विकासजी सिडाम, सौ. उर्मिला वरखडे, सौ. माधुरी वरखडे, नागोजी मडावी, दागोजी वरखडे, व समाज बांधव उपस्थित होते
आयोजित स्मृतिदिन दुसरा सत्र गोंडी रेला सांस्कृतिक नृत्य महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून आदिवासी प्रथेनूसार विधिवत पूजा अर्चना करून करण्यात आली. यावेळी डॉ. सतिश वारजुकर यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र, त्यातही अनेक थोर क्रांतिकारकांचे बलिदान आणि शौर्य अजूनही उपेक्षित असेच आहे. त्यापैकीच एक आहेत थोर क्रांतिकारी शहिद वीर बाबुराव पुलेसुर शेडमाके यांचे बलीदाना बद्दल बहुमूल्य मार्गदर्शन करून शहिदाचे प्रतिमेला अभिवादन केले
चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील माना आदिम जमात मंडळ मालेवाडा यांच्या सयुक्त विद्यमाने नागदिवाळी महोत्सव स्नेहमीलन सोहळा तथा नूतनवर्षाभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजूकर,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, जेष्ठ नेते केशवजी वरखडे,पत्रुजी दडमल,बंडू बारेकर, दिगांबर दडमल,बंडूभाऊ घोडमारे, जांबूळे सर,व समस्त समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमा दरम्यान समाज बांधवानी कार्यक्रम घेण्यासाठी व्यासपीठाची मागणी केली असता कसलाही विलंब न करता व्यासपिठाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले समाज बांधवानी डॉ. सतिश वारजुकर यांचे आभार मानले
डॉ. सतिश वारजूकर यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले शिक्षणा शिवाय सर्वांगीण विकास होत नाही, त्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाला समान बुद्धी असते म्हणून प्रत्येकाने त्या बुद्धीचा वापर करून स्वतःची प्रगती साधावी. शिक्षण व पुस्तक वाचन यामुळे बुद्धी प्रगल्भ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की मानवाचे जीवनाचे अंतिम ध्येय हे त्यांच्या बुद्धीचा विकास कसा होईल यावर असले पाहिजे. कारण जगात जे लोक हाताने काम करतात फक्त आपले पोट भरतात आणि जे लोक बुद्धी ने मेहनत करतात ते चैनीचे जीवन जगत असतात म्हणून थोर महापुरुषांचे विचार अंगी कारणे काळाची गरज आहे